एफआरपीसाठी स्वाभिमानीचा ग्रीन पॉवर शुगरवर हल्लाबोल

थकबाकीसह एकरकमी एफआरपी तातडीने देण्याची मागणी
प्रजाकसत्ताकदिनी तीव्र आंदोलन

वडूज – या गाळप हंगामातील ऊसाची एफआरपी एकरकमी द्या आणि गेल्या हंगामातील दुसरा हफ्ता तातडीने दिला नाहीतर प्रजाकसत्तादिनी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार आणि गोपूजच्या कारखाना व्यवस्थापनाला दिले.
यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास तीन महिने झाले. मात्र साखर कारखाना व्यवस्थापनाने अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही बिल जमा केलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वास्तविक ऊस नियामक कायदा 1966 नुसार गाळपाला आलेल्या उसाचे बिल चौदा दिवसात पैसे शेतकऱ्याला देणे बंधनकारक आहे. मात्र आपण शेतकऱ्यांची देणी मुदतीत अदा न करता कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्याआधी जिल्हाभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरू होती. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थित सातारा तसेच सांगली येथे झालेल्या बैठकांमध्ये एकरकमी एफआरपी अधिक 200 रुपये फॉर्म्युला सर्व साखर कारखाना व्यवस्थापनाने मान्य केला होता.

त्याफॉर्म्युल्यानुसार तीन महिन्यानंतरही साखर कारखाना व्यवस्थापनाने एफआरपीची रक्कम जमा केलेली नाही. उलटपक्षी एकरकमी एफआरपी बाबत कारखानदारांनी उलटसुलट चर्चा सुरू केल्या आहेत. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर कारखाना व्यवस्थापनाने येत्या आठवड्यात एकरकमी एफआरपी आणि गेल्या हंगामातील 400 रुपयांचा थकीत दुसरा हफ्ता तातडीने द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल व त्यामुळे झालेल्या नुकसानीला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार राहणार नाही, असा इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.
या हंगामातील एफआरपी एकरकमी जमा केली नाहीतर 26 जानेवारीला प्रजाकसत्ताकदिनी स्वाभिमानी शेतकरी संघटना उपोषणाला बसणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला ऊस शिल्लक ठेऊन गोपूज कारखाना गेटकेनचा ऊस आणतोय, याबाबतही संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. ऊसतोड करताना उसतोडणी कामगार शेतकऱ्याकडून वाढ्यापोटी 4 ते 5 हजार रुपयांची मागणी करतायत. दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के वाढे देण्यात यावेत. याबाबत कारखान्यांने ऊसतोडणी कामगारांना सूचना द्याव्यात. अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी राज्य प्रवक्ते अनिल पवार, माजी उपसभापती नाना पुजारी, तानाजी देशमुख, दत्तू काका घार्गे, विनोद खराडे, राजू फडतरे, सचिन पवार अजय पाटील, प्रमोद देवकर, शिवसेनेचे युवराज पाटील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)