‘एफआरपी’प्रश्‍नी कारखाने आणि शेतकरीही ठाम

File Photo

– समीर कोडिलकर

पुणे – राज्यात गाळप हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले, तरी अजून उसाच्या “एफआरपी’ अर्थात रास्त आणि किफायतशीर किंमतीचा प्रश्‍न सुटलेला नाही. “एफआरपी’ दोन टप्प्यांत देण्याच्या मागणीवर साखर कारखाने आग्रही आहेत, तर दुसरीकडे शेतकरी मात्र “एफआरपी’चे पैसे हे एकरकमी मिळाले पाहिजेत, या भूमिकेवर ठाम आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्याचे साखरेचे घसरलेले दर पाहता “एफआरपी’ एकरकमी देणे परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका कारखान्यांनी घेतली आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी कारखान्यांनी राज्य शासनाकडे केली आहे. पण, सरकारनेसुद्धा याबाबतचा निर्णय दिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

राज्यात ऑक्‍टोबरपासून गाळप हंगाम सुरू आहे. त्यानंतर आतापर्यंत दीडशेहून अधिक साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदाचा हंगाम आणखी दोन महिने सुरू राहील, अशी शक्‍यता आहे. कारण, जानेवारीपासून पाणी टंचाई जास्तच जाणवू लागणार आहे. त्यामुळे ऊस जास्त उपलब्ध होणार नसल्याने शेतकऱ्यांनी आताच ऊस तोडण्यास सुरूवात केली आहे. कारखानेसुद्धा ऊस स्वीकारत आहेत, पण पैशांबाबत मात्र अजून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसांत “एफआरपी’ची रकक्‍म देणे कायद्याने बंधनकारक आहे, परंतू साखरेचे मूल्याकंन व दर कमी आहे. यामुळे कारखान्यांना एकरकमी “एफआरपी’ देणे आर्थिक अडचणीचे वाटत आहे. त्यामुळे “एफआरपी’ची रक्कम दोन टप्प्यांत देण्याचा घाट राज्यातील साखर कारखानदारांनी घेतला आहे, एफआरपीच्या 80/20 फॉर्म्युल्याबाबत कारखानदारत चर्चा सुरू आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, साखर संघाने ही “एफआरपी’ची रक्कम दोन ते तीन टप्प्यांत देण्याबाबत परवानगी मिळावी, अशी मागणी सरकारनेकडे केली आहे. तथापि, सरकारनेही निर्णय दिलेला नाही.

दीड महिना झाला, तरी “एफआरपी’ देण्याचे नाव काढले जात नाही. ऊस तर गेला, हाती मात्र पैसा नाही अशी बिकट स्थिती आहे. बॅंकेने केलेले साखरचे मूल्याकंन प्रति क्विंटल 3,100 रुपये आहे. सध्याचा साखरेचे दर प्रति क्विंटल 2,900 रुपये आहे. त्यामुळेच कारखान्यांना एकरकमी “एफआरपी’ देणे अडचणीचे ठरत आहे. कारखान्यांनी आतामध्ये “एफआरपी’ एकरकमी न देता दोन टप्प्यांत 80/20 फॉर्म्युल्यानुसार देण्याचा विचार मांडला आहे. त्यावर कारखानदारांत एकमत झालेले नाही. साखर संघानेही एकरकमी “एफआरपी’ची देण्यासाठी साखरेला प्रतिक्विंटल 3,400 रुपये भाव मिळावा, अन्यथा “एफआरपी’ दोन ते तीन टप्प्यांत देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)