एफआरपीच्या चक्रात अडकवू नका

एकरकमी पैसे देण्याची शेतकऱ्यांची मागणी


“एफआरपी’चा संघर्ष पुन्हा चिघळणार

पुणे – राज्यात असणारी दुष्काळी स्थिती आणि उसावर झालेला हुमणीचा प्रादुर्भाव त्यामुळे आधीच उत्पादन कमी झाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याला एफआरपीच्या चक्रात अडकवू नका, अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे. एफआरपीची रक्कम एकरकमी द्यायची की तुकड्याने याबाबत अद्याप कारखान्यांमध्ये एकमत न झाल्याने अनेक भागात हे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने आधीच खरीप वाया गेला आहे. त्यातच पाणी साठे नसल्याने रब्बीला सुद्धा फटका बसला आहे. त्यामुळे हक्काचे पिक असणाऱ्या उसाचे पैसे ही अद्याप रखडल्याने सगळी अडचण निर्माण झाली आहे. चालू वर्षाचा 2018-19 मधील उस गाळप हंगामास 20 ऑक्‍टोबर पासून सुरुवात झाली आहे मात्र कोल्हापूर सांगली सातारा या पश्‍चिम महाराष्ट्रातील उस पट्यात एफआरपीसाठी आंदोलने झाल्यानंतर प्रत्यक्षात तेथील कारखाने एक नोव्हेंबरपासून जोमात सुरु झाले आहेत. याशिवाय 150 लाख मेट्रिक टनाहून अधिक उस गाळप पुर्ण केलेले आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर गाळप झाले असले तरी अद्याप एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत.

साखर कारखान्यानी हे पैसे कसे द्यायचे याबाबत एकमत नझाल्याने अद्याप ही हा प्रश्‍न सुटलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरल्याने सध्या म्हणावा असा उठाव अद्याप साखरेचा झालेला नाही. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी एफआरपीची रक्कम ही दोन किंवा तीन टप्यात घ्यावी अशी भुमिका मांडली आहे. त्याचबरोबर आत्ता थोडी रक्कम घ्या उर्वरित रक्कम गाळप हंगाम संपल्यानंतर मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे मात्र शेतकरी संघटनानी याबाबत पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे हे एकरकमी देण्यात यावे अशी मागणी होत आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांच्या हाती दुसरे कुठलेही पिक आले नसल्याने उसाचे पैसे सुद्धा जर वेळेवर मिळणार नसतील तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे हे पैसे थोडे उशिरा आणखी आठ दिवसांनी दिले तरी चालतील पण एकरकमी द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना डिसेंबरपर्यत मिळणे अपेक्षित आहे, कारण “एफआरपी’ रकमेप्रमाणेच ऊस बिले काढावीत अन्यथा कारखान्यातून बाहेर जाणारी साखर रोखू असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर झालेला “एफआरपी’चा संघर्ष हा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)