एफआरपीचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास प्राधान्य -देवेंद्र फडणवीस 

 साखरेचा किमान खरेदी दर 31 रुपये करण्याची केंद्राकडे शिफारस करु 

कोल्हापूर: ऊसाच्या एफआरपीचा एकूण एक पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेपर्यंत शासन गप्प बसणार नाही. याबरोबरच साखरेचा किमान भाव 29 रुपये बांधून दिला असून तो किमान 31 रुपये करावा, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वारणा कोडोली येथे शेतकरी कष्टकरी परिषदेत दिली.
रयत क्रांती संघटनेच्या वतीने वारणा कोडोली येथे आयोजित शेतकरी कष्टकरी परिषदेत ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या चार वर्षात एफआरपीसाठी एकदाही आंदोलन करायला लागले नाही. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात एफआरपीचे पैसे देण्यावर शासनाने भर दिला. राज्याने 21 हजार कोटी एफआरपीचे पैसे दिले. केवळ 120 कोटी बाकी असून तेही प्राधान्य क्रमाने देण्यास शासन बांधिल आहे.

स्वामीनाथन आयोग बासनातून बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. स्वामीनाथन यांनी हा अहवाल 2005 साली सादर केला. पण 2014 पर्यंत हा अहवाल धुळखात पडला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
राज्यातील 180 तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळ ग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. राज्यात आलेल्या दुष्काळ, बोंड आळी यासह अन्य आपत्तीवर मात करण्यास शासनाचे प्राधान्य असून गेल्या 4 वर्षात 22 हजार कोटी रुपयांची मदत शासनाने दिली आहे. यावर्षीही दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)