एप्रिल-डिसेंबर २०१७ दरम्यान भारतीय मसाले पदार्थांची निर्यात २०% वाढली

नवी दिल्ली : एप्रिल-डिसेंबर २०१७ या कालावधीत भारतीय मसाले पदार्थांची निर्यात ७.९७ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. यातून १३,१६७.९ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. ही वाढ प्रमाणाच्या तुलनेत २० टक्के, तर रुपयाच्या प्रमाणात ४% नोंदवली गेली आहे.

या निर्यातीमध्ये प्रमाण आणि उत्पन्न वाढण्यास छोटी वेलची, जिरे, लसूण, हिंग, हळद आणि इतर बिया (ओवा), मोहरी, बडीशेप, खसखस यांचेही योगदान महत्वाचे ठरले. आंतरराष्ट्रीय मसाले पदार्थ व्यापारात अस्थिरता राहिल्याने निर्यातीचे प्रमाण वाढूनदेखील मोबदल्यात फारशी किंमत मिळाली नसल्याचे दिसून आले आहे.

एप्रिल-डिसेंबर २०१७ दरम्यान मिरचीची ३५३,४०० टन निर्यात होऊन त्यातून ३,२४१.८३ कोटी रुपये उत्पन्न झाले. तर २०१६ मध्ये याच कालावधीत २६०,२५० टन निर्यात होऊन ३,४६०.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)