एपिकोर व इंडेक्‍स इन्फोटेक्‍टोकव्हरचा सहयोग

पुणे – एपिकोर सॉफ्टवेअर कॉर्पोरेशन, या व्यवसायवाढीला चालना देण्यासाठी उद्योगाशी सुसंगत सॉफ्टवेअरच्या जागतिक पुरवठादार कंपनीने आज इंडेक्‍स इन्फोटेक्‍टोकव्हर इंडियासोबत भागीदारी करारनाम्याच्या विस्ताराची घोषणा केली. या भागीदारीमधून इंडेक्‍स इन्फोटेकच्या सेवा क्षमतांना जागतिक एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) सोल्यूशन एपिकॉर इआरपीसोबत जोडण्यात आले असून त्यातून भारतातील उत्पादन, वितरण आणि सेवा उद्योगांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

या करारनाम्याचा भाग म्हणून इंडेक्‍स इन्फोटेकमधून नवनवीन ग्राहक मिळवणे, उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींनुसार अंमलबजावणी करणे आणि ग्राहकांसोबत भागीदारी करून दीर्घकालीन वाढीच्या महत्त्वाकांक्षा साध्य करणे या माध्यमांद्वारे एपिकोअरच्या व्यावसायिक वाढीला चालना दिली जाईल. इंडेक्‍स इन्फो टेकमधून एपिकोअर ईआरपी उपाययोजना भारतातील मिड मार्केट उत्पादन, वितरण आणि सेवा कंपन्यांना दिल्या जातील. इंडेक्‍स इन्फो टेक ही युनायटेड अरब अमिरातमधील (यूएई) 2011 पासून एपिकोअरची आघाडीची भागीदार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)