“एन्व्हॉर्यमेंटल’च्या कार्याची दखल इतिहासात घेतली जाईल

बारामती- पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची दखल बारामतीचा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा निश्‍चितपणे घेतली जाईल. या संस्थेचे सुरु असलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्‌गार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. फोरमच्या वतीने आयोजित मृद्गंध 2017 या शालेयस्तरावरील स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृद्गंध 2017 स्पर्धेत शालेयस्तरावर पिंपळी येथील विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर शाळेने सादर केलेल्या मृदगंध मैत्रीचा या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिराच्या नाटिकेस द्वितीय तर विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सादरीकरणास तृतीय क्रमांक मिळाला. माधवी गोडबोले, योगिता काळोखे आणि कृष्णदेव क्षीरसागर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविकात या स्पर्धेविषयी पार्श्‍वभूमी विशद केली. या स्पर्धेची उंची दरवर्षी उंचावत असून विद्यार्थी त्यांच्यामधील कलागुण अधिक ताकदीने सादर करताना दिसतात, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड. ए. व्ही. प्रभुणे, सचिव द. रा. उंडे, विश्‍वस्त ऍड. नीलीमा गुजर, श्रीकांत सिकची, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्‍वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपसभापती शारदा खराडे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

  • स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे;
    उत्कृष्ट अभिनय पुरुष- तेजस तावरे, उत्कृष्ट अभिनय महिला- आकांक्षा नागे- न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, उत्कृष्त लेखन व संवाद- नरेंद्र बढे- न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी, उत्कृष्ट दिग्दर्शन- विभागून ज्योती जोशी- विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर व कैलास हलाले- न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, उत्कृष्ट नेपथ्य- सचिन कुंभार- न्यू बाल विकास मंदिर पिंपळी, उत्तेजनार्थ पारितोषिके- धों. आ. सातव विद्यालय बारामती व विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई, बारामती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)