“ए अँड आय डायजेस्ट करंडक डिझायर्न्स सुपरक्रिकेट लीग अजिंक्यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा
पुणे: एन्ट्री विकींग्ज्, ग्रॅव्हीटो गॅन्ज् ऑफ ग्रेट, क्लासिक क्रुशेस व चंदन चॅलेर्जस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या ए अँड आय डायजेस्ट तर्फे आयोजित “ए अँड आय डायजेस्ट करंडक डिझायर्न्स सुपरक्रिकेट लीग अजिंक्यपद’ क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
यावेळी, कटारीया हायस्कूल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात निखील जैन याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एन्ट्री विकींग्ज् या संघाने सिटी लेजंडस् संघाचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव करताना विजयी सलामी दिली. तर, दुसऱ्या सामन्यात ग्रॅव्हीटो गॅन्ज् ऑफ ग्रेट संघाने गोविन स्टार्स संघाचा 7 गडी राखून सहज पराभव केला. विजयी संघाकडून सोनिक याने 35 धावा करून मोलाचा वाटा उचलला. किरण कुमार याने त्याला 21 धावा करून मोलाची साथ दिली. तर, इतर दोन सामन्यात क्लासिक क्रुशेस संघाने ऍन्ड्रु वर्ल्ड विझार्डस् संघाचा 4 गडी राखून पराभव केला. चंदन चॅलेंर्जस संघाने वीराज् लायन्स् संघाचा 9 गडी राखून सहज पराभव करत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
1) सिटी लेजंडसः 7.2 षटकात 8 गडी बाद 50 धावा (सुनिल पटेल 34, निरज कांकरीया 8) पराभूत वि. एन्ट्री विकींग्जः 5.3 षटकात 1 गडी बाद 53 धावा (उमाकांत 5, सुनिल जाधव 25, निखील जैन 9); सामनावीरः निखील जैन;
2) गोविन स्टार्सः 8 षटकात 5 गडी बाद 69 धावा (महेंद्र भोलाद्रा 20) पराभूत वि. ग्रॅव्हीटो गॅन्ज् आफ ग्रेटः 7.1 षटकात 3 गडी बाद 70 धावा (सोनिक 35, किरण कुमार 21); सामनावीरः सोनिक;
3) ऍन्ड्रु वर्ल्ड विझार्डसः 8 षटकात 4 गडी बाद 74 धावा (निखील कुंटे 12, महेश माळी 6) पराभूत वि. क्लासिक क्रुशेस (6.5 षटकात 3 गडी बाद 78 धावा (निलेश चोपडा 33, अर्लशान पी. 37); सामनावीरः निलेश चोपडा;
4) चंदन चॅलेर्जसः 8 षटकात 7 गडी बाद 40 धावा (सिध्देश भंसाळी 12, मुकेश परमार 1-3) वि.वि. वीराज् लायन्सः 4 षटकात 1 गडी बाद (जगदीश सुर्वे 27, अलनेश सोमजी 13, शिवराज सुर्वे 2-10, तुषार जाधव 2-14); सामनावीरः जगदीश सुर्वे;
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा