एन्ट्री वायकिंग्ज्‌, वीराज्‌ लायन्स्‌ संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

“ए अँड आय डायजेस्ट करंडक डिझायर्न्स सुपरक्रिकेट लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे: एन्ट्री वायकिंग्ज आणि वीराज लायन्स संघांनी ओपेल सुप्रीमोज्‌ आणि क्‍लासिक क्रुशर्स या संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या ए अँड आय डायजेस्ट तर्फे आयोजित “ए अँड आय डायजेस्ट करंडक डिझायर्न्स सुपरक्रिकेट लीग अजिंक्‍यपद’ क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

-Ads-

कटारीया हायस्कूल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत एन्ट्री वायकिंज्‌ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 10 गडी गामवून 82 धावा केल्या. यामध्ये गौरव शहा (32 धावा), स्नेहीत गादीया (26) व विनय सुर्वे (10) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना ओपेल सुप्रीमोज्‌ संघाचा डाव 12 षटकात 5 गडी गमावून 63 धावांवर संपुष्टात आला. मंगेश हांडे 19 धावा, विरल मेहता 16 व राजेंद्र शर्मा 13 यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. 3 षटकात 7 धावात 1 गडी बाद करणार्या फराझ कुरेशी याला सामनावीर हा किताब दिला.

मेहूल राठोडच्या 40 धावांच्या जोरावर वीराज्‌ लायन्स्‌ संघाने क्‍लासिक क्रुशर्स संघाचा 20 धावांनी पराभव केला. वीराज्‌ लायन्स्‌ संघाने 12 षटकात 4 गडी गमावून 133 धावा केला. अल्नेश सोमजी (30 धावा), मेहूल राठोड (40), मुकेश परमार (35) यांच्या धावांच्या जोरावर संघाने समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना क्‍लासिक क्रुशर्सचा डाव 12 षटकात 113 धावांवर मर्यादित राहीला. क्‍लासिक संघाच्या सुरेंद्र जैन याने 58 धावांची खेळी केली. पण संघाचा पराभव वाचवण्यास ही खेळी कमी पडली.

सविस्तर निकाल: 
उपांत्य फेरी – एन्ट्री वायकिंजः 12 षटकांत 10 बाद 82 (गौरव शहा 32, स्नेहीत गादीया 26, विनय सुर्वे 10, रोहीत पेडणेकर 3-19, प्रणय रांका 3-20) वि.वि. ओपेल सुप्रीमोजः 12 षटकांत 5 बाद 63 (मंगेश हांडे 19, विरल मेहता 16, राजेंद्र शर्मा 13, फराझ कुरेशी 1-7, सुनिल जाधव 1-19); सामनावीरः फराझ कुरेशी;
वीराज लायन्सः 12 षटकांत 4 बाद 133 (अल्नेश सोमजी 30, मेहूल राठोड 40, मुकेश परमार 35, यश बलडावा 2-23) वि.वि. क्‍लासिक क्रुशर्स ः 12 षटकांत 4 बाद 113 (सुरेंद्र जैन 58, निलेश चोपडा 17, यश बलडावा 15, मुकेश परमार 2-26); सामनावीरः मेहूल राठोड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)