एनिमी प्रॉपर्टी घोषित झालेल्या 9400 मालमत्तांची विक्री सुरू

किमान एक लाख कोटी रूपये मिळण्याची शक्‍यता
नवी दिल्ली – फाळणीच्यावेळी किंवा अन्य कारणांनी देश सोडून निघून गेलेल्या नागरीकांच्या भारतातील मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. चीन किंवा पाकिस्तान या राष्ट्रांमध्ये स्थलांतरीत झालेल्यांच्या या मालमत्ता असून या मालमत्तांची सध्याची संख्या 9400 इतकी आहे. या मालमत्तांच्या विक्रीतून किमान एक लाख कोटी रूपयांचा महसुल सरकारला मिळेल अशी अपेक्षा आहे. या मालमत्तांचे व्हॅल्युएशन करण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी पातळीवर समित्या नियुक्ती केल्या असून व्हॅल्युएशनचे काम कालबद्ध पद्धतीने करण्याची सूचना या समित्यांना करण्यात आली आहे.

या मालमत्तांच्या संबंधात अलिकडेच सुधारीत कायदा करण्यात आला असून त्यामुळे या मालमत्तांवर स्थलांतरीतांच्या वारसांना हक्क सांगता येणार नाहीं अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मालमत्ता आता पुर्णपणे सरकारच्या ताब्यात असून त्यांची विक्री करणे सोपे झाले आहे. या 9400 मालमत्तांपैकी 9280 मालमत्ता या भारतातून पाकिस्तानात स्थलांतरीत झालेल्यांच्या असून 126 मालत्ता या चीन मध्ये स्थलांतरीत झालेल्यांच्या आहेत. यातील सर्वाधिक मालमत्ता उत्तरप्रदेशात आहेत. त्यांची संख्या 4991 इतकी आहे तर त्या खालोखाल पश्‍चिम बंगाल मध्ये 2735 इतक्‍या मालमत्ता आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)