एनसीआर प्रकरणातून भाजपचेच वोट बॅंकेचे राजकारण…

नवी दिल्ली – एनसीआर प्रकरणात पुन्हा संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की या प्रकरणावरून भारताचे बांगलादेशाशी कायमचे संबंध बिघडू शकतात. त्या म्हणाल्या की सरकारने ज्या 40 लाख जणांना घुसखोर ठरवले आहे त्यातील केवळ एक टक्का लोकच घुसखोर असू शकतात. पण भाजप मात्र त्या सर्वांनाच घुसखोर ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे.

आमच्या पश्‍चिम बंगाल राज्यातील 833 लोक आसामातील तुरूंगात आहेत असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणावरून भाजपचे वोट बॅंकेचे राजकारण करीत आहे असा आरोप त्यांनी केला. घुसखोरीच्या संशयावरून सरकार तेथे भारतीय नागरीकांचाच छळ करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. सर्वच राजकीय पक्षांनी आपापली शिष्टमंडळे तेथे पाठवून तेथील नेमक्‍या स्थितीची माहिती घ्यावी अशी सुचनाहीं त्यांनी केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)