एनबीएफसी कंपन्यांचे शेअर कोसळले 

मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांवरही परिणाम 
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्रालय, रिझर्व्ह बॅंक आणि बाजार नियंत्रक सेबीने गुंतवणूकदरांनी भांबावून जाण्याचे काही कारण नाही, गरज पडेल तेव्हा आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे काल आणि आज सांगितले. मात्र, तरीही बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या शेअरची गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री चालू आहे.
या संस्थात म्युच्युअल फंडाचे बरेच पैसे आहेत. या संस्थाना भांडवल असुलभतेचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात असल्यामुळे फंड या संस्थातून पैसा काढूून घेण्याच्या शक्‍यतेवर विचार करीत असल्यामुळे तर या संस्थाच्या स्थिरतेलाच घरघर लागण्याची शक्‍यता असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.
या कारणामुळे या संस्थाच्या शेअरच्या भावात आजही 8.4 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचीही आज पीछेहाट झाली. शुक्रवारी या कंपन्यांच्या शेअरची घसरण झाली होती.
या घडामोडीबाबत बोलताना बीएनपी परिबा म्युुच्युअल फंडाचे फंड व्यवस्थापक अभिजित डे यांनी सांगितले की, देशातील आणि परदेशातील परिस्थिती खराब असतानाच भारतीय व्यवस्थेत भांडवल सुलभतेची चणचण भासणार असल्याच्या शक्‍यतेमुळे गेल्या सात दिवसांपासून शेअरबाजारातील वातावरण नकारात्मक झाले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)