एनडी स्टुडियोत भरणार अभिनयाची कार्यशाळा

कोल्हापूर – “बॉलिवूड थीमपार्क’ म्हणून नावारूपास आलेल्या कर्जत येथील एनडी स्टुडियोचे वलय दिवसागणिक वाढत आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या एनडी स्टुडियोच्या भव्य आवारात उभे असलेल्या बॉलिवूड थीमपार्कमध्ये पर्यटकांची नांदी पाहावयास मिळत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा खजाना असणाऱ्या याच स्टुडियोमध्ये आता, अभिनयाची कार्यशाळादेखील भरवण्यात येणार आहे.

यासंदर्भात नितीन चंद्रकांत देसाई यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी, निर्माता, लेखक व दिग्दर्शक एन. चंद्रा, प्राध्यापिका मंजू निचानी, सिनेदिग्दर्शक केतन मेहता या मान्यवरांच्या उपस्थितीत याची घोषणा करण्यात आली.

-Ads-

सिनेसृष्टीत काम करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांसाठी कथा-पटकथा, संकलन, ध्वनिमुद्रण, छायाचित्रण, वेशभूषा, दिग्दर्शन, निर्मिती तसेच इव्हेंट मेनेजमेंट आदी विषयांवर या कार्यशाळेत वर्ग भरवले जाणार आहे. शिवाय याचवेळी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या “ड्रीम ऑफ बॉलिवूड’ आणि “ड्रीम गर्ल ऑफ बॉलिवूड’ या आगामी कार्यक्रमाची देखील घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
11 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)