एनडीएने राफेल विमाने 9 टक्के कमी किमतीला घेतली – निर्मला सीतारामन 

नवी दिल्ली – एनडीए सरकारने राफेल विमाने 9 टक्के कमी किमतीला घेतल्याची माहिती आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. लोकसभेत राफेल चर्चेला त्या उत्तर देत होत्या. आपल्या उत्तरात त्यांनी राफेल विमानांच्या संख्येबाबतही वास्तविकता सांगितली. यूपीएच्या काळात राफेल विमानाची बेसिक किंमत 737 कोटी रुपये होती. आम्ही ती 670 कोटी रुपये किमतीला घेतली आहेत. ही किंमत 9 टक्के कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोफोर्सने कॉंग्रेसला बुडवले; राफेल मोदी सरकारला पुन्हा सत्तारूढ करील असा टोला सीतारामन यांनी लगावला.

यूपीए सरकारच्या काळात 18 राफेल विमाने तयार मिळ्णार होती आणि बाकी 108 विमाने 11 वर्षांच्या कालावधीत मिळणार होती. पण त्यांना 2006 ते 2014 या काळात 18 विमानेही मिळवता आली नाहीत, आम्ही सज्ज (फ्लाय अवे) विमानांची संख्या कमी केली नाही. ती 18 ऐवजी 36 केली. त्यापैकी पहिले विमान सप्टेंबर 2019 मध्ये आणि बाकी 2022 पर्यंत मिळणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एचएएल बाबत त्यांनी कॉंग्रेसला प्रश्‍न केला की कॉंग्रेस सरकारने ऑगस्टा वेस्टलॅंडची ऑर्डर एचएएल का दिली नाही? एचएएल तुम्हाला आणखी काही देऊ शकत नव्हती म्हणूनच ना? हवाई दलाला अडचणींचा सामना करावा लागत आहे , हे माहीत असूनही त्यांनी राफेल सौदा अडवून धरला. रक्षा सौदा आणि सुरक्षा सौदा यात हाच फरक आहे, असे सांगून सीतारामन पुढे म्हणाल्या की, आमचा राष्ट्रीय सुरक्षेसाठीचा व्यवहार आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षेला आम्ही प्राथमिकता देतो. त्यांना राफेल विमाने खरेदी करण्याची इच्छाच नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची जाणीव असूनही त्यांनी राफेल सौदा अड्‌वून धरला.

विमानांच्या संख्येबाबत त्यांनी सांगितले की निकडीच्या काळात विमानांची 2 स्क्वॉड्रन खरेदी केली जातात, 1982 साली पाकिस्तान सोव्हिएत युनियन कडून एफ-16 खरेदी करत होता, तेव्हा भारताने मिग 23 ची दोन स्क्वॉड्रन खरेदी केली. 1985 साली फ्रान्सकडून दोन स्क्वॉड्रन मिराज खरेदी केली. 1987 साली रशियाकडून दोन स्क्वॉड्रन मिग 29 खरेदी केली. हवाई दल सरकारला दोन स्क्वॉड्रन खरेदीचाच सल्ला देत असते.

क़ॉंग्रेसचा खोटेपणा उघड करताना त्या म्हणाल्या की, भारताचा अंतर्गत मामला असल्याने आम्ही कोणाही राष्ट्रप्रमुखाशी चर्चा करणार नाही, असे कॉंग्रेस प्रवक्ता म्हणाला, तर राहुल गांधी यांनी 28 जुलैला संसदेत आपण फ्रान्सच्या अध्यक्षांशी बोलणी केल्याचे सांगितले. यूपीएच्या काळात राफेलची किंमत 737 कोटी रुपये होती, पण 28 जुलै रोजी संसदेत ती 520 कोटी, 11 ऑगस्ट रोजी एका रॅलीत 514 कोटी, तर हैदराबादनध्ये 526 कोटी सांगण्यात आली याकडे त्यांनी लक्ष वेधले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)