एनडीएनेच राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली – कॉंग्रेसचा आरोप

विमानांच्या तांत्रिक बाबी आमच्या काळातच निश्‍चीत झाल्या होत्या


त्याचे कारण दाखवून किंमती वाढल्याचा दावा साफ खोटा

चंदीगड – संरक्षण सिद्धतेसाठी हवाईदलाला 126 राफेल लढाऊ विमानांची गरज असताना मोदी सरकारने केवळ 36 विमानांचीच ऑर्डर देऊन देशाच्या संरक्षण सिद्धतेशीच तडतोड केली आहे ती धोक्‍यात आणली आहे असा आरोप कॉंग्रेसने पुन्हा एकदा केला आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी येथे एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

ते म्हणाले की युपीए सरकारने या विमानांच्या किंमती निश्‍चीत केलेल्या असताना त्या रद्द करून चढ्या भावाने ही खरेदी का केली याचे उत्तर अजूनही सरकारकडून मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या प्रश्‍नांची उत्तरे दिली पाहिजेत.

विमानांमधील शस्त्रास्त्र यंत्रणा आणि त्यातील तांत्रिक बाबी युपीए सरकारने जशा ठरवल्या होत्या तशाच स्वरूपात ही विमाने एनडीएने खरेदी केली असताना त्याचे कारण दाखवून विमानांच्या किंमती वाढल्याचा एनडीएचा दावा खोटा आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की 126 राफेल विमाने खरेदी करण्याचा जो करार युपीएने केला होता, त्याच वेळी विमानांची रचना, त्यातील शस्त्रास्त्रे आणि सोयी या बाबी निश्‍चीत झाल्या होत्या. व पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी याचा जो उल्लेख केला आहे तोच तपशील युपीएच्या काळातील करारातही असताना या किंमती कशाच्या आधारावर वाढवल्या गेल्या याची माहिती देशाला समजली पाहिजे असे ते म्हणाले.

रडार एनहान्समेंट, हेल्मेट माऊंटेड डिस्पले, टोअड डिकॉय सिस्टीम, लो बॅंन्ड जामर, रेडिओ अल्टीमीटर, आणि विमानांची अति उंचीवरून उडण्याची क्षमता या तांत्रिक बाबी तर आमच्या काळातच निश्‍चीत झाल्या होत्या. पण या बाबी नव्याने समाविष्ट करण्यात आल्याचा देखावा करून विमानांच्या िंकंमती वाढल्या असल्याचे जर भाजपचे लोक म्हणत असतील तर त्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही असे ते म्हणाले.

युपीए सरकारच्या करारात तंत्रज्ञान हस्तांतरणाचा मुद्दा समाविष्ट नव्हता हा मोदी सरकारचा दावा तद्दन खोटा आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की युपीए सरकारच्या काळात पीआयबीने जी प्रेस नोट प्रसिद्धीला दिली होती त्यातही फ्रांसशी भारताने विमानांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार केला असल्याची माहिती दिली आहे. त्यावरून भाजपचा खोटारडेपणा साफ उघडा पडला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)