एनडीएचे सरकार जाईल तेव्हात देशात खऱ्या अर्थाने दिवाळी होईल 

चंद्राबाबू नायडू यांचे प्रतिपादन 

अमरावती: या देशातून एनडीएचे सरकार जेव्हा सत्तेवरून हद्दपार होईल त्याचवेळी देशात खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होईल असे प्रतिपादन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी केले आहे. दिवाळी निमीत्त आपल्या राज्यातील नागरीकांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की आंध्रात गेल्या महिन्यात उत्तर तटवर्ती भागात तितली वादळ आले होते. त्यात लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे पण केंद्र सरकारने आम्हाला त्यासाठी एक पैशाचीही मदत केलेली नाही. त्यांची ही भूमिका अमानवी व असंवेदनशील आहे. केंद्राकडून मदत न येताही आम्ही वादळग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली असे ते म्हणाले. आपण आंध्रप्रदेशात विजयाच्या पताका फडकवत राहु असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)