एनटीपीसीच्या निर्गुंतवणूकीला उत्तम प्रतिसाद

मुंबई – एनटीपीसीच्या निर्गुतवणूकीसाठी केंद्र सरकारने 7000 कोटी रूपयाचे शेअर आज विक्रीसाठी उपलब्ध केले होते. याला सस्थागत गुंतवणूकदारांकडून आज उत्तम प्रतिसाद मिळाला. सरकारने आज या कंपनीचे 5 टक्के इतके शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले होते. त्यातील 95 टक्के इतके शेअर संस्थागत गुंवणूकदरासाठी राखून ठेवण्यात आले होते. काही तासातच भारतातील संस्थागत गुंतवणूकदरांनी या शेअरची खरेदी केली आहे. 5 टक्के शेअर हे किरकोळ गुंवणूदारासाठी राखून ठेवण्यात आले असून ते उद्या विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. असे असले तरी काही कारणामुळे या कंपनीच्या शेअरच्या भावात 3 टक्‍क्‍यापर्यंत घट झाली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्याना 2 लाख रूपयाचे शेअर खरेदी करता येणार आहेत. सकरारने आतापर्यंत निर्गुंतवणूकीच्या माध्यमातून 8800 कोटी रूपयाचा निधी जमा केला आहे. आता त्यात किमान 7 हजार कोटी रूपयाची भर पडणार आहे. सरकारने या वर्षी निर्गुंतवणूकीच्या माध्यमातून 75500 कोटी रूपये उभे करण्याचे ठरविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)