‘एनजीटी’च्या प्रभारी अध्यक्षपदी माजी न्या. जावेद रहिम

पुणे: सर्वोच्च न्यायालयातर्फे राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) प्रभारी अध्यक्षपदी कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जावेद रहीम यांची मंगळवारी निवड करण्यात आली. एनजीटी बार असोसिएशनच्या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या नियुक्तीचे आदेश दिले आहे.

केंद्र शासनाने ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांच्या माध्यमातून ही हरित लावादामध्ये अध्यक्षांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. या विनंतीचे दखल घेत सर्वोच्च न्यायालयातर्फे ही अंतरिम नियुक्ती करण्यात आली. पूर्ण वेळ अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत लवादाचे कामकाज प्रभारी अध्यक्ष करतील.

गेल्या काही काळापासून देशातील लवादांमध्ये मनुष्यबळ कमतरतेची समस्या भेडसावत होती. अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये लवादातील रिक्त जागा भरता येत नव्हत्या. या जाग भरण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या समितीमध्ये अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश आणि केंद्र शासनाचे दोन अधिकारी यांचा समावेश असतो. माजी न्या. रहिम यांच्या नियुक्तीमुळे लवादाचे कामकाज पुन्हा सुरू होऊन, लवकरात लवकर कामे मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

माजी न्या. रहिम कर्नाटक उच्च न्यायालयात 2006 ते 2014 या काळात न्यायधीश पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी दोन वर्षे कर्नाब्क लॉ कमिशनचे सदस्य म्हणून काम पाहिले. कामातील वरिष्ठतेमुळे त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.

नियुक्‍त्यांना मिळणार गती
पुण्यातील लवादाबाबत सांगायचे झाल्यास, राष्ट्रीय हरित लावादावर प्रभारी अध्यक्षांच्या नियुक्तीमुळे विभागीय लवादातील नियुक्‍त्यांना गती मिळेल. लवादातील सदस्यांची नेमणूक पूर्ण झाल्यावर त्याचे कामकाज पुन्हा एकदा सुरू होऊन प्रलंबित खटल्यांबाबत लवकर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जून महिन्यात लवादाला सुट्टी असल्यामुळे लवादाचे कामकाज जुलैपासून सुरू होईल. सद्यस्थितीत देशात 2945 खटले प्रलंबित असून शहरात लवादातील 500 खटले प्रलंबित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)