“एनएसएस’च्या विद्यार्थ्यांकडून उद्यान परिसराची स्वच्छता

वडगाव : उद्यान परिसरातील प्लास्टिक, कागद व पालापाचोळा कचरा उचलून गवत काढताना राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी.

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजता श्रीमंत महादजी शिंदे उद्यान परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेवून श्रीमंत महादजी शिंदे यांचा इतिहास समजून घेतला.

या उद्यानात दैनंदिन खेळण्यासाठी अनेक बालके तसेच त्यांचे पालक येतात. या उद्यानाच्या परिसरात प्लास्टिक, कागद व पालापाचोळा कचरा पडला. असून, परिसरात जंगली गवत वाढल्याने उद्यानात उंदीर, साप, विंचू व मुंग्यांचा वावर वाढला. परिसरात मच्छर अधिक वाढल्याने उद्यानात आलेल्या बालक व पालकांची गैरसोय होत होती. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उद्यान परिसरातील प्लास्टिक, कागद व पालापाचोळा कचरा उचलला. वाढलेले जंगली गवत काढून टाकून परिसर चकाचक केला.

प्रा. महादेव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना श्रीमंत महादजी शिंदे यांचा इतिहास सांगितला. प्रा. रोहिणी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली. प्रा. सुधीर ढोरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भाऊ लावंड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शीतल दुर्गाडे यांनी केले. प्रा. अशोक गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)