पुणे जिल्हा: एनईएस हायस्कूलमध्ये रक्‍त तपासणी शिबीर

निमसाखर – येथे महालॅब व आरोग्य विभाग या संयुक्‍तपणे एन. ई. एस. हायस्कूल व जुनिअर महाविद्यामध्ये रक्‍त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. येथील निमसाखर एज्युकेशन सोसायटीच्या एन.ई.एस हायस्कूल व कनिष्ठमहाविद्यालयामध्ये नुकतेच धर्मवीर संभाजी महाराज व छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त रक्‍त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महालॅब व आरोग्य केंद्राकडून सुमारे 100 विद्यार्थी व शिक्षकांचे एच. बी. इलेक्‍ट्रो फोर्ससेस, थॉयराईड व शुगर तपासणी करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव रवींद्र रणवरे, मुख्याध्यपक नवनाथ बागल, चंद्रकांत बोंद्रे, किसवे सर, वैभव हणमंते, महालॅबचे तुषार पानसरे, चिंतामणी गायकवाड, अजित गायकवाड, सागरे रणवरे, संतोष पानसरे व संदिप दरेकरसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)