एनआरसीच्या मुद्‌द्‌यावरून अमित शहांची राहुल गांधी व ममतांवर टीका

कोलकाता – केवळ मतपेढीच्या राजकारणाची गरज म्हणून ममता बॅनर्जी आसामातील एनआरसीला विरोध करीत आहेत. त्यांच्या सरकारने बेकायदेशीर बांगलादेशींना पाठीशी घातले असून भ्रष्टाचाऱ्यांनाहीं त्यांनी पाठीशी घातले आहे त्यामुळे या सरकारला उखडून फेकून द्या असे आवाहन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.

बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीत राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही अमित शहा यांनी यावेळी केली. येथील जाहीर सभेत त्यांनी ममता बॅनर्जींच्या सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार राज्यातून उखडून टाकण्यासाठी पश्‍चिम बंगाल मधील प्रत्येक जिल्ह्यात आपण सभा घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावर अमित शहा यांनी यावेळी जोर दिला. ते म्हणाले की या पक्षांना बांगला घुसखोर का हवे आहेत? एनआरसीमुळे बांगला घुसखोर शोधण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे पण केवळ व्होट बॅंकेच्या राजकारणामुळे ममता आणि राहुल गांधी त्याला विरोध करीत आहेत.

-Ads-

भाजप साठी देश प्रथम आहे त्यानंतर बाकीचे सारे, असे स्पष्ट करून आपले सरकार बांगला घुसखोरांना देशाच्या बाहेर घालवून देईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. एनआरसीची प्रक्रिया पुर्ण करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)