एनआरआय’साठी रोखे काढावे लागणार: कौशिक बसू  

रुपयाचे मूल्य सध्या आवश्‍यकतेपेक्षा जास्त आहे. रुपयांचे मूल्य प्रति डॉलर 71 रुपये या पातळीवर गेल्यानंतरच या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पडेल. 
कौशिक बसू 
अर्थमंत्रालयाचे माजी मुख्य सल्लागार 
मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य बरेच कमी झाले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला आपले बरेच डॉलर गेल्या महिन्यात विकावे लागले आहेत. जर रुपयाचे मूल्य 70 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले तर रिझर्व्ह बॅंकेला अनिवासी भारतीयासाठी पुन्हा रोखे जारी करावे लागणार आहेत.
यातून 30 ते 35 अब्ज डॉलर उभारले जाऊ शकतात. तसे झाले तर रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास मदत मिळू शकणार आहे. 2013 मध्ये अमेरिकेने व्याजदर वाढीची घोषणा केल्यानंतर रुपयाचे मूल्य असेच कमी झाले होते. त्यावेळी रिझर्व्ह बॅंकेने रोखे विक्रीची यशस्वी प्रयोग केला होता. आता पुन्हा बॅंकेला त्या शक्‍यतेवर विचार करावा लागणार असल्याचे बॅंक ऑफ अमेरिकेने अभ्यास अहवालात म्हटले आहे.
या अगोदर बॅंकेन तीन वर्ष कालावधीचे रोखे जारी करून 30 अब्ज डॉलर उभे केले होते. रुपयाचे मूल्य स्थिर झाल्यानंतर बॅंकेने ते पैसे परत केले. आताच्या आकडेवारीनुसार चालू खात्यावरील तूट 2.4 टक्‍क्‍यांवर जाण्याची शक्‍यता आहे. त्या अवस्थेत रिझर्व्ह बॅंकेला आपल्या गंगाजळीतील 20 अब्ज डॉलर विकावे लागण्याची शक्‍यता आहे. जर शेअरबाजारातील गुंतवणूक परत गेली तर पुन्हा मोठा खड्डा पडणार आहे. त्या अवस्थेत रिझर्व्ह बॅंकेला रोख्याच्या माध्यामातून 35 अब्ज डॉलर उभारावे लागण्याची शक्‍यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.
चालू खात्यावरील तुटीचा प्रश्‍न सुटल्याशिवाय भारताचे चलन स्थिर होणार नाही. त्यासाठी निर्यात वाढवावी लागणार आहे. मात्र जागतिक व्यापार युद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढत नाही. तर दुसरीकडे अमेरीकेने व्याजदर वाढविल्यामुळे भारतातील गुंतवणूक तिकडे वळू लागली आहे. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)