एनआरआयच्या मालमत्ता व्यवहारांवर आयटीची नजर

अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीसंदर्भातील व्यवहारांवर प्राप्तीकर विभाग सध्या करडी नजर ठेऊन आहे. येत्या काही महिन्यात प्राप्तीकर विभाग हा एनआरआयकडून विक्री केल्या जाणाऱ्या मालमत्तेवर लक्ष ठेवणार आहे. एवढेच नाही तर करासंबंधीच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबतचेही सर्व्हेक्षण केले जाणार आहे.

गेल्या आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाने अनेक नोटिसा बजावल्या होत्या. त्यात शॉर्ट डिडक्शयन किंवा टीडीएससंबंधी विलंबासारख्या लहान प्रकरणांचा देखील समावेश होता. अशाप्रकारची सर्व प्रकरणे हे लहान व्यापाऱ्यांशी निगडित होते. 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या सध्याच्या आर्थिक वर्षासाठी सीबीडीटीने प्रत्यक्ष कृती आरखडा तयार केला. अनिवासी भारतीयांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मालमत्तेवर लक्ष ठेवणार असल्याचे बॉर्डाने त्यात म्हटले आहे. अशा प्रकरणात खरेदीदार केवळ एक टक्का टीडीएस भरतो. मात्र, तो वीस टक्के असणे अपेक्षित आहे.

– विधिषा देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)