एनआयएच्या कारवाईनंतर अरुण जेटलींचा विरोधकांवर निशाणा 

नवी दिल्ली – इस्लामिक कट्टर पंथीयांच्या एका नव्या संघटनेचा पर्दाफाश करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआय) मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एनआयएची स्तुती करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. ज्या इलेक्‍ट्रॉनिक इंटरसेप्‍शनचा विरोधी पक्ष विरोध करत होते. हे यश याच इंटरसेप्‍शनमुळे मिळाले आहे, असे ट्विट अरुण जेटलींनी केले.

अरुण जेटली म्हणाले कि, दहशतवाद्यांचे मॉड्यूलचा एनआयएने चांगल्या पद्धतीने पर्दाफाश केला आहे. ते पुढे म्हणाले, संगणकावर पाळत ठेवल्याशिवाय ही कारवाई शक्य झाली असती का? असा प्रश्न त्यांनी विचारला. विरोधकांवर निशाणा साधताना अरुण जेटली म्हणाले, युपीए सरकारच्या काळात संगणकावर पाळत ठेवण्यात आली नव्हती का? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करत आयबी, सीबीआय,ईडी, महसुल गुप्तचर, आयकर विभाग, रॉसारख्या एकूण दहा संस्थांना कोणत्याही संगणकांत घुसखोरी करून तेथील माहिती तपासण्याचे व डाटा संकलीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)