“एनआयए’कडून हैदराबादेत 7 ठिकाणी छापे

हैदराबाद – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आज हैदराबादमध्ये 7 ठिकाणी छापे घातले. हे छापे 2016 मधील इसिसच्या प्रकरणाशी संबंधित होते, असे “एनआयए’च्या प्रवक्‍त्याने सांगितले. हैदराबादेतील संशयितांवरील आजच्या छाप्यांदरम्यान “एनआयए’ने काही डिजीटल उपकरणे आणि गुन्हेगारी साहित्यही जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याने या प्रवक्‍त्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला.

2016 साली हैदराबादमधील काही युवकांनी अन्य काही गुन्हेगारांबरोबर मिळून देशाविरोधात युद्ध पुकारण्याचा कट केल्याची खात्रीशीर माहिती “एनआयए’ला मिळाली होती. सार्वजनिक घातपात करण्यासाठी या युवकांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठाही जमा केला होता.

-Ads-

ते देशभरातील काही धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींनाही लक्ष्य करणार होते. या प्रकरणाचा तपास “एनआयए’ने पूर्ण केला असून 11 जणांविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या 11 जणांपैकी तिघेजण फरार होते. या प्रकरणाशी संबंधित काही धागेदोरे मिळाले असल्याने आज ठिकठिकाणी छापे घालण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)