एड्‌स हा आजार नाहीसा करण्यासाठी युवा पिढीने सक्रिय व्हावे – हेमल इंगळे

कोल्हापूर -आयुष्यामध्ये अनमोल असलेला वेळ वाया न घालवता स्वत:साठी करताना समाजासाठी काही ना कही तरी केले पाहिजे. स्वत:चे ध्येय गाठण्याबरोबरच समाजाला भेडसावणारा एड्‌ससारखा आजार नाहीसा करण्यासाठी युवा पिढीने सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन मिस अर्थ इंडिया हेमल इंगळे यांनी केले.

सायबर महाविद्यालयात झालेल्या युवा दिन व पंधरवडा कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. सीपीआरचे जिल्हा एडस्‌ नियंत्रण पथक, सायबर महाविद्यालयाच्या समाजकार्य विभागातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होत्या.
हेमल इंगळे म्हणाल्या, प्रत्येकाने आयुष्यात ध्येय ठरविले पाहिजे. ते स्वत:च्या व्हिजन मध्ये परिवर्तीत झाले पाहिजे. ध्येय गाठण्यासाठी अनेक आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. वेळेचे काटेकोर नियोजन, आहार, फिटनेसकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील म्हणाले, समाजात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होत आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपा म्हणाल्या युवा दिन व पंधरवड्यानिमित्त जिल्ह्यात व्याख्यान, पथनाट्य, रक्तदान शिबिर, विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विनायक साळुंखे, प्रा. डॉ. के. प्रदीपकुमार यांची भाषणे झाली. चित्तेश मांडोळे, मकरंद चौधरी, कपिल मुळे, संदीप पाटील, प्रा. डॉ. डी.एन.वळवी, प्रा. डॉ. पी.एस.रणदिवे, प्रा. बी.एन.पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. सोनिया रजपूत यांनी स्वागत केले तर विनायक देसाई, स्नेहन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)