एड्‌सग्रस्तांना दिलासा (भाग-२)

एड्‌सग्रस्त रुग्णांवर उपचार, त्यांना शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये भरतीचा समान अधिकार बहाल करणारा महत्त्वाचा अधिनियम लागू झाला आहे. एड्‌सग्रस्त रुग्णांना समाजात भेदभावाची वागणूक मिळू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा एक स्तुत्य निर्णय असून, एड्‌सग्रस्तांना समाजात चांगली वागणूक मिळण्यासाठी प्रथम या आजारासंबंधीचे गैरसमज नष्ट व्हायला हवेत.

एड्‌सग्रस्तांना दिलासा (भाग-१)

जगभरात सुमारे 3 कोटी 67 लाख लोक एचआयव्ही-एड्‌सने ग्रस्त आहेत. भारतात अशा रुग्णांची संख्या 21 लाख असून, सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. सन 2015 मध्ये या आजारामुळे जगभरात 11 लाख तर भारतात 68 हजार मृत्यू झाले. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एड्‌सग्रस्त रुग्णांना भेदभावयुक्त वागणूक दिली गेल्याच्या घटना समोर येतात.

-Ads-

एका सर्वेक्षणानुसार, भारतात सुमारे 67 टक्के एड्‌सग्रस्त रुग्णांना भेदभावयुक्त वागणुकीचा सामना करावा लागतो. अशा रुग्णांना एकतर आपला आजार लपवून ठेवावा लागतो किंवा सार्वजनिक ठिकाणी भेदभावयुक्त वागणूक सहन करावी लागते. केंद्र सरकारने 2030 पर्यंत एचआयव्ही-एड्‌सचे पूर्णपणे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटनेच्या (नाको) म्हणण्यानुसार, 18 टक्के एचआयव्हीग्रस्त रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्यांकडून किंवा शेजाऱ्यांकडून भेदभावयुक्त वागणूक मिळते. नऊ टक्के रुग्णांना शिक्षणसंस्थेत अपमान आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. सामाजिक स्तरावर जोपर्यंत या आजाराप्रती जागरूकता निर्माण होणार नाही, तोपर्यंत भेदभावयुक्त वागणूक या रुग्णांना सहन करावी लागेल. त्यासाठीच समाजात या आजाराविषयी असणारे संभ्रम दूर होणे ही प्राथमिक गरज आहे. एचआयव्हीग्रस्त रुग्णांनाही इतरांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे आणि समाजाने तो स्वीकारायला हवा. या रुग्णांना आपलेसे केले, तरच त्यांचे जीवन सुखी होऊ शकेल. एड्‌सविषयी कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता या रुग्णांशी मैत्री करणे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

– वनिता कापसे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)