एडब्लूइएस करंडक फुटबॉल स्पर्धा: एफसी पुणे सिटीने एफसी गोवाला बरोबरीत रोखले

पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने एफसी गोवा संघाला 3-3 असे बरोबरीत रोखताना एडब्लूइएस करंडक स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केली.

गोवा येथील टिळक फुटबॉल मैदानावर झालेल्या या लढतीत सामन्याच्या सुरुवातीला एफसी पुणे सिटी संघाने जोरदार चढायांना प्रारंभ केला. तिसऱ्या मिनिटाला एफसी पुणे सिटीच्या मॅथ्यू मिल्सने गोल करून संघाचे खाते उघडले.
त्यानंतर एफसी गोवा संघाच्या आघाडीच्या फळीने प्रतिआक्रमण केले. परंतु एफसी पुणे सिटीच्या गोलरक्षक बिलाल खान याने सुरेख गोलरक्षण करत एफसी गोवाचे आव्हान परतवून लावले. दिएगो कार्लोसने 42व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचे सोने करताना गोल करून पूर्वार्धाअखेर एफसी पुणे सिटी संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धात मात्र एफसी गोवा संघाच्या खेळाडूंनी आपल्या खेळात नवीन रणनीती आखत वेगवान खेळ केला. हेडन फर्नांडिसने 52व्या मिनिटाला चेंडूवर उत्तम ताबा मिळवत गोल करून संघाची पिछाडी 1-2 अशी कमी केली. त्यानंतर 59व्या मिनिटाला एफसी गोवाच्या लालरेम्पूईयाने गोल करून संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

लालरेम्पूईयाने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत 69व्या मिनिटाला आणखी एक गोल करून एफसी गोवा संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र सामन्याच्या भरपाई वेळेत एफसी पुणे सिटीच्या एमिलियानो अल्फारोने गोल केल्यामुले हा सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. एफसी पुणे सिटी संघाचा पुढचा सामना येत्या रविवारी डेंपो एफसीशी होणार आहे.

सविस्तर निकाल- साखळी फेरी – एफसी पुणे सिटी- 3 (मॅथ्यू मिल्स तिसरे मि., दिएगो कार्लोस 42वे मि., एमिलीयानो अल्फारो 92वे मि.) बरोबरी वि. एफसी गोवा- 3 (हेडन फर्नांडिस 52वे मि., लालरेम्पूईया 59 व 69वे मि.).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)