“एटीव्ही’स्पर्धेत “पीसीसीओईआर’ची उल्लेखनीय कामगिरी

रावेत – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या (पीसीसीओईआर) संघाने पंजाब मधील आयआयटी रोपर येथे आयोजित केलेल्या बाजा एसएई इंडिया 2018 या एटीव्ही चॅम्पियनशिप स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केली.

सोसायटी ऑफ ऍटोमोटिव्ह इंडिया (एएसई) अंतर्गत आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील एकूण 60 आयआयटी, एनआयटी, शासकीय तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पीसीसीओईआरच्या नॅशोर्णस टीमने आणि प्रशांत माळवी या कुशल चालकाने उल्लेखनीय कामगिरी करीत संघाला पहिल्याच प्रयत्नात पाचवा क्रमांक मिळवून दिला.

डायनॅमिक, स्लेड पुल, ऍक्‍सलरेशन टेस्ट, सस्पेंशन अँड ट्रॅक्‍शन, इंड्युरन्स रेस, स्टॅटिक इव्हेंट, डिजाईन प्रेझेंटेशन अशा विविध विभागांमध्ये संघाने लक्षणीय कामगिरी केली. त्यांना अभियांत्रिकी प्रमुख प्रा. शाम मानकर, प्रा. सुखदिप चौगुले, प्रा. अनंत कु-हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व प्राध्यापकांचे व प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, उपाध्यक्ष पद्मा भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खजिनदार एस. डी. गराडे, विश्वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)