एटीपी फायनल्सच्या अंतिम फेरीत आमने-सामने

वर्षातील शेवटच्या टेनिस सामन्यासाठी जोकोविच आणि अलेक्‍सझांडर झवेरेव्ह सज्ज

लंडन: जागतिक क्रमवारीत पहील्या क्रमांकावर असणाऱ्या जोकोविचने केविन अँडरसनचा 6-2,6-2 असा पराभव करात अंतिम फेरी गाठली. तर अलेक्‍सझांडर झवेरेव्ह स्वीस खेळाडू रॉजर फेडररचा 7-5, 7-6(7-5) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. टेनिस वर्षातील शेवटच्या स्पर्धेच्या अंतिमफेरी गाठल्याने या वर्षातील शेवटचा अंतिम सामना जिंकण्यासाठी हे दोन खेळाडू आमनेसामने आले आहेत.

अलेक्‍सझांडर झवेरेव्ह आणि रॉजर फेडरर . दोन्ही सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. तरुण झवेरेव्हच्या वेगवान सर्वीस आणि जलद हालचालींना आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रत्युत्ततर दिले. परंतु, पहिल्या सेटनंतर दुसरा सेट देखील टायब्रेकरमध्ये गमावल्याने फेडरर या सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे आपले 100 वे विजेतेपद जिकंण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे. यांचा सामना अनेक कारणांमुळे प्रकाशझोतात राहिला. बॉल बॉयच्या एका कृतीमुळे सामन्यात गोंधळ निर्माणझाला होता आणि सामन्याला थोडावेळ रोखण्यात आले होते.. तर अंतिम सामन्यात फेडरर आणि जोकोव्हिच यांचा सामना पाहण्यासाठी इच्छुकांनी सामना फेडररला गमवावा लागल्यानंतर झवेरेव्हला बु … करून आपली नापसंती दर्शवली होती.

दुसऱ्या सामन्यात जोकोव्हिचने आपला प्रतिस्पर्धी केविन अँडरसनला विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवयाची परतफेड करण्याची कोणतीच संधी दिली नाही. जोकोव्हिचने हा सामना 6-2, 6-2 असा सहज आपल्या खिशगात घालत अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. जलद सर्वीस करणाऱ्या केवीनला आज सुरच गवसला नाही. तो आज पूर्णपणे निष्प्रभ दिसत होता. आपल्या परतीच्या फटाक्‍यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जोकोव्हिचने आज सर्व्हिसमध्ये देखील आपला दबदबा राखला आणि दोन्ही सेट सहज जिंकले. मागील चार सामन्यात त्याची सर्वीस ब्रेक करण्यात विरोधी खेळाडूला अपयश आले आहे.

या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना जोकोव्हिच म्हणाला, मी मागील सहा महिन्यात ज्या उच्च स्तराचा खेळ करत आहे त्याचा मला अभिमान आहे. मी याच स्पर्धेमध्ये झवेरेव्हचा पराभव केला होता. परंतु, या अंतिम सामन्यात त्याला कमी लेखून चालणार नाही. तो त्यांच्या सर्वोत्तम खेळाच्या आसपास देखील नाही. आमच्या दोघांसाठीदखील हा अंतिम सामना वर्षातील शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे जो चांगला खेळ करेल तो विजेता ठरेल.

बॉल बॉयमुळे झालेला गोंधळ –

फेडरर – झ्वेरेव यांच्यातील सामना या सामन्याचा निकालापेक्षा बॉलबॉयसह झालेल्या एका घटनेमुळे अधिक चर्चीला गेला. या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये रॉजर फेडरर 4-3 असा आघाडीवर होता. त्याने केलेले सर्वीस झ्वेरेव ने परतवले आणि परत खेळ बंद करण्याचा इशारा केला. चेअर अम्पायरने खेळ थांबवला. त्यानंतर रिप्लेमध्ये दाखवण्यात आले की, फेडररच्या पाठीमागील एका बॉलबॉयकडून हातातील चेंडू खाली पडला आणि तो परत घेण्यासाठी तो बॉल बॉयने आपली जागा सोडली. या सर्व घटनांमुळे झवेरेव्ह लक्ष विचलीत झाले त्याने ही रॅली थांबवली.
परंतु, या घटनेचा सामन्यावर खूप मोठा परिणाम झाला. आघाडीवर असलेल्या फेडररला त्याची सर्वीस राखण्यात अपयश आले. त्यानंतर झ्वेरेव्हने गुण मिळवत टायब्रेकरमध्ये आघाडी घेतली आणि हा टायब्रेकर जिंकत सामनाही जिंकला. सामना झाल्यावर प्रेक्षकांना त्याची ही कृती आवडली नाही त्यानी बू … करत आपली नापसंती दर्शविली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)