एटीएसने घातपाताचा कट उधळला…

सुधन्वा गोंधळेकरसह तिघांना अटक : स्फोटकांचा मोठा साठा जप्त


तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – पुणे, सातारा, मुंबई, सोलापूर आणि नालासोपारा या ठिकाणी होणारा घातपाताचा कट उधळण्यात एटीएसला यश आले आहे. याप्रकरणी एटीएसने सुधन्वा गोंधळेकरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसने ही कारवाई नालासोपारा येथे केली. या कारवाईत भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यात एटीएसने कारवाई करत भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान हस्तगत केले. शिवाय त्याच घरातून वैभव राऊत याला अटक केली. वैभवच्या चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसने अटक केली. आज कोर्टात आरोपींना हजर केल्यानंतर महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा डाव असल्याचे समोर आले.

मुंबई सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना हजर करण्यात आले. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात केलेल्या कारवाईत 20 गावठी बॉम्ब, 2 जिलेटिनच्या कांड्या हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शरद कळसकरकडे बॉम्ब कसा बनवायचा? याचा नोट सापडली, तर वैभव राऊतकडून 22 गोष्टी हस्तगत केल्या आहेत. शिवाय, सुधन्वा गोंधळेकर हा दोघांशी फोनवर संपर्कात होता. बॉम्बचा वापर कुठे होणार होता?, कसा होणार होता? हे कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का? याचा तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.

धक्कादायक म्हणजे, सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा सातारा येथील रहिवासी असून शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित आहे. शिवप्रतिष्ठान संघटना ही संभाजी भिडे यांची आहे. तर शरद कळसकर आणि वैभव राऊत हे दोघे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त आहेत.

वैभव राऊतकडे काय काय सापडलं?
12 देशी बॉम्ब
2 जिलेटीन कांड्या
4 इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर
22 नॉन इलेक्‍ट्रॉनिक डिटोनेटर
सेफ्टी फ्यूज वायर
1500 ग्राम पांढरी पावडर
विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या
6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्‍स
बॅटरी कनेक्‍टर
कन्व्हरसह अन्य साहित्य


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)