एटीएम सेवा विनाअडथळा सुरू ठेवा

नेवासा फाटा – व्यवहाराच्या सुलभतेकरिता आणि खातेदारांच्या सोयीकरिता ए.टी.एम सुविधा राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सुरू केली आहे. ही सेवा विनाअडथळा सुरू ठेवा, अशी मागणी पंचायत समिती सभापती सुनीता गडाख यांनी केली.

बॅंकांच्या मुख्य व्यवस्थापकांना याबाबतचे निवेदन गडाख यांनी दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ए.टी.एम.च्या सुविधेमुळे खातेदारांचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालतात. या सेवेचा हजारो शेतकरी, कामगार, व्यापारी लाभ घेत आहेत. परंतु, तालुक्‍यात एटीएम सेवा 7 ते 8 महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची अडचण होत आहे. ए.टी.एम. सेवा ग्राहकांच्या सेवेकरिता कायम सुरू ठेवावी. येत्या तीन दिवसांमध्ये ही सेवा सुरळीत सुरू न झाल्यास आंदोलन छेडून बॅंकांना टाळे ठोकले जाईल, असा इशारा गडाख यांनी दिला.

निवेदनावर सभापती गडाख, उपसभापती राजनंदिनी मंडलिक, नगरसेवक लक्ष्मण जगताप, काकासाहेब गायके, महेश मापारी, गणेश कोरेकर, विशाल सुरडे, नीलेश जगताप, अभय गुगळे, देविदास साळुंके, प्रकाश सोनटक्के, आदित्य जगताप यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)