एटीएम सेंटर फोडून पंधरा लाखाची रोकड चोरी

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)-
सातारा शहराच्या उपनगरातील बारावकरनगर व अमरलक्ष्मी बसस्टॉप येथे मंगळवारी पहाटे अज्ञात इसमांनी एटीएम सेंटर कटरने फोडून पंधरा लाखाची रोकड लांबवल्याने एकच खळबळ उडाली. उपनगरातील दोन एटीएम फोडली गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोडोली व संभाजीनगर ह्या दोन्ही उपनगरामध्ये मध्यरात्री एटीएम फोडाफोडीचा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी पहाटे अज्ञातांनी या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर फोडले. यामधील एका एटीएम सेंटरमधून 15 लाख रुपये चोरट्यांच्या हाती लागले. रक्कम आणखी वाढण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे.
पहाटे चोरी होत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले मात्र तोपर्यंत अज्ञात इसमांची टोळी रक्कम लुटून पसार झाली होती. शहर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फूटेजची तपासण्याचे काम सुरू आहे. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून तपासासाठी पथके ठिकठिकाणी रवाना केली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)