एटीएम रोकडसह चालक फरार

पिंपरी – एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 74 लाख रुपयांची रोकड घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.31) दुपारी दोनच्या सुमारास ऍक्‍सिस बॅंकेच्या कोकणे चौकातील शाखेमध्ये घडली. यामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा तत्काळ तपासाच्या कामाला लागली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथील ऍक्‍सिस बॅंकेच्या शाखेमध्ये असलेल्या एटीएममध्ये भरण्यासाठी 74 लाखांची रोकड घेऊन व्हॅन आली होती. यावेळी गाडीतील सुरक्षारक्षक खाली उतरताच व्हॅन चालकाने व्हॅनसहित रोकड घेऊन पळून गेला. ही महिती समजताच वाकड व सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असून, या माध्यमातून आरोपीचा माग काढला जात आहे. या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत, परिस्थितीची पाहणी करत तपास करण्याच्या सूचना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)