एटीएम मशीनच्या चोरीचा डाव फसला

पिंपरी – चाकण जवळील म्हाळुंगे येथील एटीएम सेंटर मधील एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न फसला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे तीन ते तीनच्या दरम्यान घडली.

अश्‍विनी मुखर्जी (वय-35, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्‌याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्वोदय स्मॉल फायनान्स बॅंकेचे हे एटीएम होते. चोरट्यांनी दरवाजाची काच फोडून मशीनचे नुकसान केले आहे. मात्र, एटीएम मशीन चोरुन नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले आहेत. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)