पुणे, दि.20 – बाणेर परिसरातील एका बॅंकेच्या एटीएम केंद्रात शिरलेल्या चोरट्यांनी एटीएम यंत्रनेची तोडफोड करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
ऋषीकेश बोधे (44) यांनी या संदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात सफायर चेंबर इमारतीच्या तळमजल्यावर ऍक्‍सीस बॅंकेचे एटीएम केंद्र आहे. शनिवारी मध्यरात्री एटीएम केंद्रात पैसे काढण्याच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी एटीएम यंत्रनेची तोडफोड केली. यंत्रातील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोकड काढता न आल्याने चोरटे पसार झाले. पोलिसांकडून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पडताळण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)