एटीएम मधील रोकड उपलब्धता वाढत आहे…

स्टेट बॅंकेने केला दावा 
नवी दिल्ली – देशातल्या काही राज्यांमधील एटीएम मशिन्स मध्ये खडखडाट निर्माण झाला असल्याच्या तक्रारी आल्यानंतर रोकड उपलब्धतेसाठी त्वरेने उपाययोजना हाती घेण्यात आली असून आता या मशिन्स मधील रोकड उपलब्धता वाढत आहे अशी माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात आली आहे. पीएनबी, कॅनरा बॅंक, ऍक्‍सिस बॅंक अशा बॅंकांच्या एटीएममध्येही रोकड टंचाई निर्माण झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे जनतेचे पैशा अभावी मोठे हाल सुरू झाल्याची बातमी सर्वत्र झळकली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता परिस्थिती सुधारत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे.

रिझर्व्ह बॅंकांकडे तसेच अन्य बॅंकांमध्ये पुरेशी रोकड आहे त्यामुळे जरी काहीं ठिकाणी ही टंचाई निर्माण झालेली असली तरी ही परिस्थिती तात्पुरती असून ती समस्या लवकरच दूर होईल असा दिलासा कालच रिझर्व्ह बॅंक आणि सरकारकडून देण्यात आला होता. शक्‍य तितक्‍या लवकर ही स्थिती पुर्ण सुरळीत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती एसबीआयचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर नीरज व्यास यांनी दिली. या स्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेऊन आहोत असेही एसबीआयच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एसबीआयच्या प्रवक्‍त्याने सांगितले की आत्ताच्या घडीला आमच्या बॅंकेच्या एटीएममधील स्थिती 92 टक्के सुधारली आहे. काल ही स्थिती 85 टक्के इतकी होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)