एटीएम कार्डची गोपनीय माहिती आर्थिक फसवणूक

वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे – मोबाईलवर फोन करून एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेऊन तरूणीच्या खात्यातून परस्पर ऑनलाईन पध्दतीने 80 हजार रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार
उघडकीस आला. रविवारी (दि. 14) दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. याप्रकरणी संजय कांबळे (वय 17) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात
भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन करून त्यांच्या एटीएम कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे भामट्याने बहिणीच्या खात्यातून ऑनलाईन पध्दतीने 80 हजार रूपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली. दरम्यान, ही बाब फिर्यादी यांच्या बहिणीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरीत पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस निरीक्षक यु. ए. तावसकर हे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)