एटीएमवरील व्यवहार करताना काळजी घ्या

सायबर क्राईम सेलचे आवाहन

पुणे – मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऐन दिवाळीच्या दिवसात एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पैसे काढताना किंवा भरताना काळजी घेण्याचे आवाहन सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. यानूसार सायबर क्राईम सेलने काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चतुःशृंगी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार पावणेपाच लाख रुपयांची आतापर्यंत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवाळीमध्ये पाषाण, बाणेर, औंध, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रेंजहिल्स यासारख्या भागातील एटीएम केंद्रांवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या शंभरहून अधिक नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपये अनोळखी व्यक्तींनी काढून घेतल्याचा प्रकार मागील वर्षी घडला होता. यासंबंधी तक्रारी आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने काही जणांना अटक केली होती. दरम्यान या दिवाळीतही हाच प्रकार पुन्हा घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

ऑनलाइन व्यवहार करताना ही काळजी घ्या 
– एटीएममध्ये संशयास्पद आढळल्यास व्यवहार टाळा.
– स्कीमरद्वारे कार्डची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते.
– की-पॅडवर पिन क्रमांक टाकण्यापूर्वी कॅमेरा, रेकॉर्डर नसल्याची खात्री करणे.
– संशयास्पद व्यक्तीविषयी सुरक्षारक्षकास माहिती देणे.
– सुरक्षित (एचटीटीपीएस) वेबसाइटसचाच वापर करा.
– खरेदीपूर्वी त्या वेबसाइटची सत्यता पडताळून व बारकाईने पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)