कोल्हापूर – स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी येथील ट्रेझरी शाखेतील एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करून, कार्डधारक व्यक्‍तीने एटीएममधून बॅंकेच्या वेगवेगळ्या नऊ खात्यांवरून 16 वेळा रकमा काढून 5 लाख 10 हजार रुपयाला गंडा घातला.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात संबंधित एटीएम कार्डधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 21 जून ते 13 जून 2018 तसेच दि. 6 जुलै 2018 या काळात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेचे मुख्य प्रबंधक जगदीश संतेबछली किचबसाप्पा यांनी फिर्याद दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)