एटीएममध्ये “कॅश’ भरण्याच्या वेळेत बदल – गृह मंत्रालय

नवी दिल्ली – पुढील वर्षापासून एटीएममध्ये “कॅश’ भरण्याच्या वेळेत बदल होणार आहे. या संसर्भातील सूचना गृहमंत्रालयाने जारी केली आहे. नवीन सूचनेनुसार शहरांमध्ये रात्री नऊ वाजेपर्यंतच “कॅश’ भरली जाईल तर गावांत संध्याकाळी सहानंतर एटीएम्समध्ये कॅश भरली जाणार नाही.

नक्षल प्रभावित क्षेत्रांत तर एटीएममध्ये संध्याकाले चार वाजेपर्यंतचा कॅश भरली जाणार आहे; त्यासाठी एटीममध्ये “कॅश’ पेहचवणाऱ्या एजन्सीजनचा सकाळीच बॅंकेतून कॅश घ्यावी लागणार आहे आणि संध्याकळी चारपूर्वी सुरक्षाकर्मींसह व्हॅनने एटीएममध्ये भरावी लागणार आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशांनुसार कॅश भरण्याच्या वेळांमधील हे बदल 8 फेब्रुवारी 2019 पासून लागू होणार आहेत.
“कॅश’ घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या सुरक्षेबाबतही कडक निर्देश दिले आहेत. कॅश व्हॅनमध्ये ड्रायव्हरबरोबर 2 बंदुकधारी सुरक्षाकर्मी, 2 एटीएम ऑफिसर आणि एक्‍ बॅंक कस्टोडियन असणे अनिवार्य होणार आहे. दोन बंदुकधारी सुरक्षाकर्मींपैकी एकजण ड्रायव्हरच्या शेजारी आणि दुसरा मागे बसलेला असेल. सर्व कॅश व्हॅन्सन जीपीएस प्रणाली असलीच पाहिजे. नसेल तर ती व्हॅन क्‍लॅश घेऊन जाऊ शकणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)