एटीएममधून दीड लाख लंपास

पिंपरी – पिंपरीतील ऍक्‍सिस बॅंकेचे एमटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात शनिवारी (दि. 1) सकाळी उघडकीस आली.

सहायक निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या समोर ऍक्‍सिस बॅंकेचे एटीएम आहे. शुक्रवारी (दि. 30) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एमटीएममध्ये प्रवेश केला. एमटीएमचे शटर बंद करून घेत तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला. त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून त्यातील दीड लाखांची रोकड चोरून नेली.

-Ads-

सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान ऍक्‍सिस बॅंकेचे सुरक्षा पथक नेहमीप्रमाणे एटीएम तपासणीसाठी आले. त्यावेळी त्यांना एमटीएमचे शटर बंद दिसले. त्यांनी शटर उघडून पाहिले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित याबाबत पिंपरी पोलिसांना कळविले. वायसीएम व डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामुळे दिवस रात्र वर्दळ असलेल्या या परिसरात एटीएम फोडल्याच्या या घटनेमुळे पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
वर्षभरापूर्वी इनोव्हा मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी संभाजीनगर परिसरात गॅस कटरने एटीएम कापून चोरी करताना लागलेल्या आगीत एटीएम जळून खाक झाले होते. असाच प्रकार पाषाण परिसरात घडला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला. शनिवारी उघडकीस आलेल्या चोरीमुळे एटीएमच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)