एटीएमचे क्‍लोन बनवून दांपत्यास घातला दीड लाखाचा गंडा

राहाता: राहाता येथील वकील व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एटीएम कार्डचे क्‍लोन बनवून अज्ञात चोरट्याने 1 लाख 46 हजार रुपयांची रक्कम चोरली. याबाबत नगर येथील सायबर सेलला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत राहाता येथील वकील मोहनराव रावजी गाडेकर व त्यांच्या पत्नी माधुरी मोहनराव गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या राहाता शाखेत जाईंट खाते आहेत. पती-पत्नी दोघांकडेही एटीएम कार्ड आहे. 28 व 29 डिसेंबर दरम्यान मोहन गाडेकर व त्यांची पत्नी माधुरी यांच्या स्टेट बॅंकेच्या खात्यातून सुमारे 1 लाख 46 हजारांची रक्कम काढल्याचा मेसेज आला. त्यामध्ये मोहन गाडेकर यांचे अकौंटमधून 28 डिसेंबर 18 रोजी 80 हजार व 29 डिसेंबर 18 रोजी 40 हजार, असे मिळून 1 लाख 20 हजार, तर त्यांच्या पत्नी माधुरी गाडेकर यांच्या अकौंटमधून 28 डिसेंबर 18 रोजी एकूण 26 हजार, असे पती-पत्नींच्या खात्यातून एकूण 1 लाख 46 रुपयांची रक्कम चोरीस गेली. आपल्या एटीएम कार्डव्दारे कुटुंबातील कोणी पैसे काढले की काय ? याची चौकशी केली असता, त्यांना समजले की पती-पत्नी पैकी कोणीही एटीएमचा वापर करून पैसे काढलेले नाहीत, असे पुढे आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर त्यांनी बॅंकेकडून जाऊन आम्ही रक्कम काढली नाही. मग आमच्या खात्यावरील रक्कम गेली कुठे, अशी विचारणा केली असता, एटीएम कार्डचे क्‍लोन बनवून गैरवापर करून रक्कम लांबविली असण्याची शक्‍यता वर्तविली गेली. त्यांनंतर गाडेकर यांनी दोघांचेही एटीएम कार्ड बॅकेतून ब्लॉक केले वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील मोठी रक्कम वाचली. गाडेकर यांनी झालेल्या घटनेबाबत नगर येथील सायबर सेल शाखेकडे या संदर्भातील गुन्हा नोंदविला आहे. एटीएम कार्डचे क्‍लोन बनवून एवढी मोठी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याने ग्राहकांमध्ये व एटीएमधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे लांबविण्याच्या घटना एटीएम केंद्रात घडल्या होत्या. मात्र आता डायरेक्‍ट एटीएम कार्डचे क्‍लोन बनवून एवढी मोठी रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याने बॅंकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)