एटीएमची माहिती घेत 38 हजार काढून घेतले

दौंड -येथे एसबीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत तुमच्या एटीएम कार्डची मुदत संपली आहे. ती जर 2021 पर्यंत वाढवयाची असल्यास तुमचे संपूर्ण नाव, एटीएम कार्डचे सोळा अंकी नंबर द्यावे लागेल. असे सांगत एटीएम कार्डची संपूर्ण दिल्याने दौंडमध्ये एका व्यक्तीच्या खात्यातून एटीएमद्वारे 38 हजार 998 रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना आज (दि. 13) रोजी घडली आहे.
या फसवणूकप्रकरणी मकरंद निवृत्ती सातपुते (वय 28, रा. माऊली बिल्डिंग, दौंड, जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सातपुते यास आज सकाळी अज्ञात व्यक्तीनी मोबाईलवर फोन करीत एसबीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगत एटीएम कार्डची मुदत संपली आहे. ती जर 2021 पर्यंत वाढवायची असल्यास तुमची संपूर्ण माहिती व एटीएम नंबर द्यावे लागेल, असे सांगत समोरच्या व्यक्तीला एटीएम नंबरची संपूर्ण माहिती दिल्यावर आज एक तासात बॅंकेच्या खात्यातून वेळोवेळी 38 हजार 998 रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. दौंड पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)