एटीएमचा गैरवापर करून लाखोंचा अपहार

सातारा – येथील आयुर्वेदीक औषध विक्रेते संतोष ज्ञानू जाधव (रा. सैदापूर) यांच्या बॅंक खात्याचा व एटीएमचा गैरवापर करून लाखो रूपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष जाधव यांचा शाहू स्टेडियजवळ आयुर्वेदीक औषध विक्रीचा व्यवसाय आहे. 2017 मध्ये कर्जाची आवश्‍यकता होती. त्यांनी जाहिरात वाचून संपर्क साधला. फोनवर बोलणाऱ्याने स्वत:चे नाव नीरजकुमार सांगितले. त्याने जाधव यांची खात्यासंदर्भात माहिती मागवली.

त्यानंतर काही दिवसांनी तुमचे 1 लाख 75 हजारांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून एटीएम पाठवून देण्यास सांगितले. जाधव यांनी एटीएम कुरीयरमार्फत जयपूर येथे पाठवले. यानंतर या एटीएमद्वारे 4 ते 5 लाखांचे व्यवहार झाले. बेंगळूर येथील सायबर क्राईमने हे एटीएम ब्लॉक केले. आपल्या खात्याचा वापर हॅकर्सनी केला असल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)