एच1बी व्हिसाचे नियम झाले कडक 

आता इबी-5 व्हिसासाठी भारतीयांचे प्रयत्न वाढले 

नवी दिल्ली: सध्याचे अमेरिकन प्रशासन कठोर भूमिका घेत असल्यामुळे एच1बी व्हिसा घेऊन अमेरीकेत जाणे खूप कठीण झाले आहे. त्याचबरोबर यावर्षी अर्ज एच1बी व्हिसाच्या 85,000च्या कोट्यासाठी 190,000 अर्ज दाखल करण्यात आले. या कारणामुळे, अर्ध्यापेक्षा अधिक अर्जदारांचे अमेरिकेला जाण्याचे स्वप्न अधुरे राहिले. यातून मार्ग म्हणून आता अनेक भारतीय ईबी-5 व्हिसाच्या माध्यामाचा पर्याय म्हणून विचार करीत आहेत.

इबी5 व्हिसा योग्य नागरिकांना फक्त स्वतःसाठीच नाही, तर त्यांच्या आप्तजनांसाठीही अमेरिकेत कायमस्वरूपी निवास मिळवण्याची संधी देतो. गुंतवणूकदाराला आपल्याला हव्या असलेल्या रोजगाराच्या क्षेत्रात 5 लाख डॉलर्सची किंवा बिगर टी.ई.ए.मध्ये 10 लाख डॉलर्सची गुंतवणूक करता येते आणि 10 अमेरिकन नोकऱ्या निर्माण करता येतात. सुमारे 95 टक्के गुंतवणुक सरकारी मान्यताप्राप्त आणि प्रादेशिक नियामक केंद्रांमार्फत केल्या जातात. हे प्रादेशिक केंद्रांच्या माध्यमातून केले जाते, असे कॅनएम एंटरप्रायझेस संचालक अभिनव लोहिया यांनी सांगीतले.

इबी 5 गुंतवणूकदारांना त्यांच्या अर्जावर प्रक्रिया केल्यावर इतर रोजगारावर आधारित व्हिसा वर्गवारीच्या तुलनेत लगेचच ग्रीन कार्ड दिले जाते. इबी 5 गुंतवणूकदाराला अमेरिकेत प्रायोजकाची गरज नसते. भारतात वार्षिक पातळीवर अर्जांमध्ये 30 ते 40 टक्के वाढ दिसून आली आहे, असे ते म्हणाले.

यावर्षी 2014 च्या 99 इबी-5 व्हिसांच्या तुलनेत 700 इबी-5 व्हिसांसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे भारताचा क्रमांक चीन आणि व्हिएतनामनंतर लागतो, असे त्यानी सांगीतले.

अमेरिकन कॉंग्रेसने इबी-5 प्रोग्रामसाठी गुंतवणुकीच्या आवश्‍यकतेत वाढ झाल्याचे प्रस्तावित केले आहे.गुंतवणुकीत वाढ आणि काढून टाकण्याची भीती यांच्यामुळे भारतीय अर्जदारांची संख्या 80 टक्‍क्‍यांपर्यंत कमी होण्याची शक्‍यता आहे. तथापि, सध्याच्या कायद्यांतर्गत अजून एखादा कमी कालावधीचा विस्तार मिळाल्यास भारतातून सादर करण्यात येणाऱ्या अर्जांच्या संख्येत प्रचंड वाढ होईल, असे त्यांना वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)