“एच-4’व्हिसाधारकांचे वर्क परमिट काढायला विरोध

वॉशिंग्टन – “एच1- बी’ व्हिसाधारकांच्या “एच-4′ व्हिसा धारक जोडीदारांकडील वर्क परमिट काढून घेण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला अमेरिकेतील प्रभावशाली खासदार, आयटी उद्योगातील प्रतिनिधींनी विरोध दर्शवला. या “आयटी’ उद्योगामध्ये फेसबुकसारख्या मातब्बर “आयटी प्लॅटफॉर्म’मधील भारतीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. “एच 1-बी’ व्हिसाच्या नियमांमध्ये दुरुस्ती करून हजारो जणांना अमेरिकेच्या कार्यविश्‍वातून घालवून देण्याने या संबंधितांच्या कुटुंबियांवर मोठी आपत्ती येऊ शकते. याशिवाय याचा अमेरिकेच्या अर्थकारणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सिलीकॉन व्हॅलीतील “फॉरवर्ड- युएस’ने म्हटले आहे. “फॉरवर्ड-युएस’ची स्थापना फेसबुक, गुगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी केली आहे.

ओबामा यांच्या काळातील अमेरिकेचे नागरिकत्व आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसबाबतचे नियम संपुष्टात आणण्याच्या धोरणासंदर्भात अमेरिकेतील माध्यमांनी कालच वृत्त प्रसिद्ध केले होते. “एच 4′ धोरणांतर्गत वर्क परमिट मिळालेल्यांमध्ये बहुतेक भारतीय कर्मचाऱ्यांच्या वैवाहिक जोडीदारांचा समावेश आहे. यापैकी 80 टक्के महिला आहेत. त्यांनी अधिक रोजगार मिळवण्यासाठी अमेरिकेत यशस्वीपणे नोकरी, उद्योग मिळवला आहे. पतीच्या “एच 1- बी’ व्हिसाच्या आधारे अमेरिकेत येण्यापूर्वी त्यांनी जवळच्या देशांमधून पदवीही संपादन केलेली आहे.
“एच-4′ व्हिसाच्या आधारे अंदाजे 1 लाख नागरिकांना वर्क परमिट देण्यात आलेले आहे, असेही कॅलिफॉर्नियातील 15 खासदारांच्या एका गटाने म्हटले आहे.

ओबामा यांच्या काळातील “एच-4′ कमी केल्यास “एच 1-बी’धारकांवरील आर्थिक ताण वाढेल, असे होमलॅन्ड सिक्‍युरिटी सेक्रेटरी क्रिस्टेन एम निल्सन यांनी म्हटले आहे. या धोरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या अनेकांना उच्च पगाराच्या नोकऱ्या सोडून जावे लागेल. तसेच कुशल मनुष्यबळासाठीची गुंतवणूकही कमी होईल,अशाच अर्थाचे पत्र ऍना ईशू आणि राजा कृष्णमूर्ती यांच्यासारख्या अन्य खासदारांनीही लिहीले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)