एच 1 बी व्हिसा प्रकरणावरुन : ऍपलसह बड्या कंपन्यांचा ट्रम्प यांना विरोध

अमेरिकेचा आर्थिक विकास खुंटण्याची व्यक्त केली भीती

न्युयॉर्क – स्थानिक नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसाच्या नियमांमध्ये कठोर बदल करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या निर्णयाचा त्यांनी फेर विचार करावा यासाठी ऍपल, पेप्सीकोसह आघाडीच्या आणखीन पाच डझन कंपन्यांच्या सीईओंनी ट्रम्प यांना पत्र लिहून व्हिसाच्या नियमांमध्ये बदल झाल्यास अमेरिकेचा आर्थिक विकास खुंटण्याची भीती व्यक्त केली आहे.

भारत आणि चीनसारख्या देशांतून हजारोंच्या संख्येने प्रशिक्षित मनुष्यबळ अमेरिकेत येत असून ते अमेरिकेच्या विकासाला हातभार लावत आहेत. ट्रम्प यांच्या एच-1 बी व्हिसा धोरणांत सुसंगती नसल्याने या स्थलांतरितांमध्ये अस्थिरतेची भावना आहे. त्यामुळे ते अमेरिका सोडून अन्य देशांत जाण्याची शक्‍यता आहे. तसे मोठया प्रमाणावर घडल्यास जागतिक बाजारपेठेत आणि औद्योगिक क्षेत्रात अमेरिकेची स्पर्धात्मकता घटू शकते, असे या संघटनेने म्हटले आहे. त्यामध्ये ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक, पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी, मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय बंगा आणि सिस्को सिस्टीम्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चक रॉबिन्स आदींचा समावेश आहे.

ट्रम्प बाहेरून येणाऱ्या कुशल लोकांना प्रतिबंध घालू इच्छित आहेत. परंतू येथील अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार या लोकांचा अमेरिकेलाच फायदा होत आहे, असेही पत्रात लिहिण्यात आले आहे. तसेच कुशल परदेशी कर्मचाऱ्यांबाबत सरकार जी वागणूक देण्याचा विचार करत आहे त्यावरही पत्रामध्ये प्रश्‍न उपस्थित केले गेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)