एचसीएल आशियाई टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा : ‘यांचा’ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

मुलींच्या गटातील भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

पुणे, दि. 25 – मुलांच्या गटात भारताच्या देव जावीयाने तर मुलींच्या गटात उझबेकीस्तानच्या यास्मीन करीमजानोवा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देताना एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीतून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर, एकेरीत मुलींच्या गटातील सर्व भारतीय खेळाडूंचे आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात देव जावीयाने थायलंडच्या आठव्या मानांकित सुकसुमराम टीचा टायब्रेकमध्ये 7-6 (4), 6-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने जपानच्या तायो हिरानोचे आव्हान 6-1, 6-2असे सहज मोडीत काढले. पाचव्या मानांकित मेघ भार्गव पटेलने कडवी झुंज देत हॉंगकॉंगच्या की लुंग एनजीचा 6-2, 3-6, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताच्या सातव्या मानांकित मन शाहने दिग्विजय प्रताप सिंगचा टायब्रेकमध्ये 7-6(5) 6-4असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. अव्वल मानांकित कझाकस्तानच्या डॉस्टनबीके ताशबुलतावने क्वालिफायर भारताच्या क्रिश पटेलचा 6-2, 6-2असा पराभव करून आगेकूच केली.

मुलींच्या गटात एकेरीत उझबेकीस्तान यास्मीन करीमजानोवाने जपानच्या दुसऱ्या मानांकित हिमरी सातोचा 6-3 6-4असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. थायलंडच्या आठव्या मानांकित थायलंडच्या मई नपात निरुदोर्न हिने भारताच्या मल्लिका मराठेवर 3-6 6-0 6-3असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. तिसऱ्या मानांकित थायलंडच्या मनचया सवांगकिइने चीनच्या जियाकी हुंगला 6-0 6-4असे नमविले. अव्वल मानांकित हॉंग कॉंगच्या वांग हॉंग यी कोडीने कडवा प्रतिकार करत थायलंडच्या पुनिन कोवापीतुकतेडचा 6-3 3-6 6-1असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत, मुलांच्या गटात सिध्दांत बांठीयाने मेघ भार्गव पटेलच्या साथीत नथ्यूत एन व सेबॅस्टियन नोटाफ्ट यांचा 7-5 7-6(7)असा पराभव केला. देव जावीया व मन शहा या जोडीने केविन पटेल व आर्यन झवेरीयांचा टायब्रेकमध्ये 6-4 7-6(2)असा पराभव केला.

सविस्तर निकाल – उप-उपांत्यपूर्व फेरी : मुले –
डॉस्टनबीके ताशबुलताव (कझाकस्तान) (1) वि.वि क्रिश पटेल (भारत) 6-2, 6-2, सिध्दांत बांठीया (भारत) (4) वि.वि. तायो हिरानो (जपान) 6-1, 6-2, सेर्गेय फोमीन (उझबेकिस्तान) (2) वि.वि. नथ्यूत एन (थायलंड) 6-3, 6-2, मेघ भार्गव पटेल (भारत) (5) वि.वि. की लुंग एनजी (हॉंगकॉंग) 6-2, 3-6, 6-1, सच्चीत शर्मा (भारत) वि.वि साई कार्तिक रेड्डी गंटा (भारत) 6-0, 6-4, देव जावीया (भारत) वि.वि. सुकसुमराम टी (थायलंड) (8)7-6(4), 6-4, मन शाह (भारत) (7) वि.वि दिग्विजय प्रताप सिंग (भारत) 7-6(5) 6-4, सीओन यॉंग हन (कोरिया) (3) वि.वि. अथर्व निमा (भारत) 6-4 6-1

मुली – वांग हॉंग यी कोडी (हॉंग कॉंग) (1) वि.वि. पुनिन कोवापीतुकतेड (थायलंड) 6-3 3-6 6-1, प्रिस्का मॅडेलिन नुगरो (इंडोनेशिया) (4) वि.वि साकी इमामुरा (जपान) 6-3 6-3, जियाकी वांग (चीन) (7) वि.वि प्रियांशी भंडारी (भारत) 6-0 6-1, मई नपात निरुदोर्न (थायलंड) (8) वि.वि मल्लिका मराठे (भारत) 3-6 6-0 6-3, मनचया सवांगकिइ (थायलंड) (3) वि.वि जियाकी हुंग (चीन) 6-0 6-4, यास्मीन करीमजानोवा (उझबेकीस्तान) वि.वि हिमरी सातो (जपान) (2) 6-3 6-4, मना कावामुरा (जपान) (5) वि.वि सेव्हील युलदाशिव (उझबेकिस्तान) 7-6(6) 6-2, फुना कोझाकी (जपान) (6) वि.वि. याकतेरिना दिमित्रीचेंको (कझाकस्तान) 4-6 6-3 6-2,
दुहेरी गट-उपांत्यपूर्व फेरी – मुले –

सिध्दांत बांठीया(भारत)/मेघ भार्गव पटेल(भारत)(1) वि.वि नथ्यूत एन (थायलंड/ सेबॅस्टियन नोटाफ्ट (हॉंगकॉंग) 7-5 7-6(7), क्रिस्टीन डीडीयर चिन(मलेशीया)/ सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान) (3) वि.वि. ओ डेडा मुहम्मद ए रझ्झा (इंडोनेशिया)/कबिर हंस (भारत) 6-1 6-1
देव जावीया(भारत)/मन शहा(भारत) वि.वि केविन पटेल(भारत)/आर्यन झवेरी(भारत) 6-4 7-6(2)
सीओन यॉंग हन(कोरिया)/ सुकसुमराम टी(थायलंड)(2)वि.वि साई कार्तिक रेड्डी गंटा(भारत)/माधवीन कामत(भारत) 4-6 6-2 [12-10]

दुहेरी गट मुली-
हिमारी सातो(जपान)/मनचया सवांगकिइ(थायलंड)वि.वि. याकतेरिना दिमित्रीचेंको(कझाकस्तान)/ यास्मीन करीमजानोवा(उझबेकीस्तान) 6-2, 6-4;
प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)/ जियाकी वांग(चीन)(4) वि.वि जियाकी हुंग(चीन)/ वांग होई की जेनी 6-2, 6-2;
मना कावामुरा(जपान)/फुना कोझाकी(जपान)वि.वि.काव्या सेव्हेनी(भारत)/सेव्हील युलदाशिव(उझबेकिस्तान)6-3, 6-4;
साकी इमामुरा(जपान)/पुन्नीन कोवापिटुकटेड(थायलंड)वि.वि. मई नपात निरुदोर्न(थायलंड)/ वांग हॉंग यी कोडी(हॉंग कॉंग)(2)6-2, 6-1.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)