“एचसीएमटीआर’ बाधितांना 13 कोटी

पिंपरी – शहरातील अकरा ठिकाणचे मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि उच्चक्षमता द्रुतगती मार्गाने (एचसीएमटीआर) बाधीत क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. बाधीत क्षेत्राचा मोबदला संबंधित मालमत्ताधारकांना खासगी वाटाघाटीने देण्यासाठी जागेचे मुल्यांकन ठरविण्यात आले आहे. ही मुल्यांकन रक्कम तब्बल 13 कोटी 54 लाख रूपये झाली आहे.

शहरात ठिकठिकाणी रस्ता तसेच एचसीएमटीआरने बाधीत जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. येथील नागरिक खासगी वाटाघाटीने बाधीत जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यास तयार आहेत. त्यासंदर्भात 2 जानेवारी 2019 रोजी खासगी वाटाघाटी समितीची बैठक पार पडली. या सभेत संबंधित मालमत्ताधारक यांच्यासमवेत चर्चा झाली. समितीने मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि एचसीएमटीआरने बाधीत क्षेत्राचा मोबदला संबंधित मालमत्ताधारकांना खासगी वाटाघाटीने देण्यात यावा, असे ठरले आहे. त्यासाठी बाधीत होणाऱ्या जागेचे मुल्यांकन ठरविण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामध्ये रावेत येथील 24 मीटर रस्त्याने बाधीत असलेल्या 267.34 चौरस मीटर जागेचे मुल्यांकन 80 लाख 25 हजार रूपये एवढे आहे. रावेत येथील 18 मीटर रस्त्याने बाधीत 100 चौरस मीटर जागा (30 लाख 2 हजार), 18 मीटर रस्त्याने बाधीत 200 चौरस मीटर जागा (60 लाख 4 हजार), चोविसावाडी येथील 45 मीटरपैकी 30 मीटर रस्त्याने बाधीत 96 चौरस मीटर जागा (7 लाख 50 हजार), चऱ्छहोलीतील 18 मीटर रस्त्याने बाधीत 295 चौरस मीटरच्या तीन जागा (1 कोटी 20 लाख), पिंपळे-गुरव येथील एचसीएमटीआर 30 मीटर बाधीत 298.62 चौरस मीटर जागा (73 लाख 4 हजार), सांगवीतील 18 मीटर व 9 मीटर दोन रस्त्याने बाधीत 4299.99 चौरस मीटर जागा (8 कोटी 99 लाख 73 हजार), पिंपरीतील 9 मीटर आणि 7 मीटर रस्त्याने बाधीत 37.17 चौरस मीटर जागा (6 लाख 93 हजार), पिंपरीतील 9 मीटर रस्त्याने बाधीत 263.82 चौरस मीटर जागा (76 लाख 45 हजार) अशी या अकरा कामांसाठी एकूण 13 कोटी 53 लाख 99 हजार रूपये मुल्यांकन रक्कम होत आहे. त्या अनुषंगाने लागणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, वकील फी आणि इतर खर्चास महापालिका स्थायी समितीने मंजुरी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)